दि. 11/03/2016 च्या जाहिरातीस अनुसरुन www.cahexam.com या संकेतस्थळावरुन ज्या उमेदवारांनी परीपुर्ण ऑनलाईन अर्ज भरुन बँकेत परिक्षा शुल्क भरलेले होते अशा उमेदवारांनी दि. 06/07/2017 च्या जाहिरातीस अनुसरुन नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहिल परंतु अशा उमेदवारांना पुन्हा परिक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. परंतु असे करताना 11/03/2016 च्या जाहिरातीस अनुसरुन ज्या पदाला अर्ज केला होता त्या पदाकरीताच अर्ज करण्यासाठी पुन्हा परिक्षा शुल्क न भरण्याची सवलत राहील अन्यथा नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल याची नोंद घ्यावी.

तसेच ज्या उमेदवारांना परिक्षा शुल्क माफ होते अशा (माजी सैनिक व अपंग) उमेदवारांनी देखील नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहिल.


06/07/2017 च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज करणा-या उमेदवाराने 2016 च्या जाहिरातीस अनुसरुन केलेल्या अर्जातील निवडलेले पद, नाव, जन्म दिनांक, लिंग, सामाजिक आरक्षण, बँकेत भरलेले शुल्क इ. जुळणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी.

दि. 11/03/2016 च्या रद्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन ऑनलाईन अर्ज (परिक्षा शुल्कासह) भरलेल्या सर्व उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर न केल्यास 2017 च्या भरती प्रक्रियेकरिता त्यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

दि. 11/03/2016 च्या जाहिरातीस अनुसरुन www.cahexam.com या संकेतस्थळावरुन परीपुर्ण ऑनलाईन अर्ज भरुन बँकेत परिक्षा शुल्क भरलेले होते अशा उमेदवारांची यादी

पशुधन पर्यवेक्षक

वरिष्ठ लिपिक

लिपिक टंकलेखक

वाहन चालक